धक्कादायक.! अल्पवयीन 17 वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच दिला जन्म; नंतर त्या नवजात चिमुकल्याला दुसऱ्या मजल्यावरून दिलं फेकून...

धक्कादायक.! अल्पवयीन 17 वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच दिला जन्म; नंतर त्या नवजात चिमुकल्याला  दुसऱ्या मजल्यावरून दिलं फेकून...

प्रतिनिधी : राजेश देवडकर

पुणे : पुण्यातील कोंडवे धावडे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिला आहे.! व त्यानंतर या नराधम अल्पवयीन आईने जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे या घटनेची दखल घेत; याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर अल्पवयीन मुलगी गरोदर असताना ती तपासणीसाठी कुठे गेली.! आणि सदर ठिकाणच्या डॉक्टरांनी ही माहिती संबंधित यंत्रणेला दिली आहे की नाही; याची जबाबदारी निश्चित करून डॉक्टरांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. तर जन्म दिलेले दोन दिवसीय नवजात अर्भक ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, बाळाच्या तब्येतीवर आयोग जातीने लक्ष देत आहे.

https://twitter.com/Maha_MahilaAyog/status/1581694457182707712?s=20&t=PTLzCVlNt7oyNGP_eoUhAg