ST च्या ताफ्यात लवकरच दाखल होणार 4 हजार नवीन बस; तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढनार.? लालपरीचे अच्छे दिन.!

ST च्या ताफ्यात लवकरच दाखल होणार 4 हजार नवीन बस; तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढनार.? लालपरीचे अच्छे दिन.!

प्रतिनिधी - मुंबई

गोरगरिबांची "जीवनवाहिनी" अर्थात लालपरी (एसटी) चे अच्छे दिन लवकरच येणार असल्याचे चिन्ह: दिसत आहेत. कारण.! मिळालेल्या माहितीनुसार, उद्या होणाऱ्या राज्य परिवहन संचालक मंडळाच्या बैठकीत;  एसटी महामंडळाला चार हजार नव्या गाड्या देणाचा निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

उद्या राज्य परिवहन मंडळाची 302 वी बैठक होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. मागील 2 वर्षाचा कोरोना काळ त्यातच एसटी कामगारांनी पुकारलेला संप.! यामुळे महामंडळाचे खूप नुकसान झालं आहे. आता कुठे परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. तोपर्यंत पुन्हा कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता उद्याच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली असून, ज्या गाड्या आहेत त्या देखील वाईट परिस्थितीत आहेत. कर्मचारी संख्या अधिक आणि गाड्या कमी अशी अवस्था महामंडळाची झाल्याने; हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तर महागाई भत्ता देखील 28 टक्क्यांवरून 34 टक्के करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.