नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात.! 11 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता...
![नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात.! 11 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_6340f87fe2ba3.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : किरण मुक्कावार
आताची एक मिठी बातमी समोर आली आली आहे.! यवतमाळ ते मुंबई जाणार्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशीक जवळ अपघात झाल्याने; या अपघातात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तसेच 20 ते 25 प्रवासी जखमी असल्याची माहिती देण्यात आली असून, जखमीनवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार.! यवतमाळ ते मुंबई जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशीक जवळ अपघातात झाला. यात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या दुर्देवी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटांतच बस जळून खाक झाली आणि आत अडकलेले प्रवासी जिवंत होरपळून मृत्यूमुखी पडले. याचे थरारक व्हिडिओ आता समोर आले आहेत. नाशिकमध्ये पहाटे सव्वापाच वाजता एका लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसला भयंकर आग लागली आणि यात 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस असून, यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे ही बस जात होती. ही लक्झरी बस दुमजली होती. अपघात झाला तेव्हा बसमधील डिझेलच्या टाकीने पेट घेतला. आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण आग वाढल्याने जे प्रवाशी बसच्यया वरच्या मजल्यावर होते त्यांना बाहेर पडता आले नाही. या अपघातात अनेक जण जिवंत जळाले आहेत, त्यांचा आता फक्त सांगाडा उरला आहे.
काही प्रत्यक्षदर्शींनी अशीही माहिती दिली की, मृतदेह नेण्यासाठीही रुग्णवाहिका नव्हत्या, त्यामुळे सिटी बसमधून या अपघातामध्ये जिवंत जळालेल्यांचे मृतदेह नेण्याची वेळ आली होती. बसमध्ये किमान 50 प्रवासी होते. त्यातील 25 प्रवाशांना आम्ही जळताना पाहिलं, असंही काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. अग्निशमन दल हाकेच्या अंतरावर असूनही वेळेत मदत पोहोचू शकली नाही, असा आरोपही प्रत्यक्षदर्शिनी केला आहे.