रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादानंतर; शिंदेंच्या आणखी दोन आमदारात जुंपली.! थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादानंतर; शिंदेंच्या आणखी दोन आमदारात जुंपली.! थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार...

NEWS15 प्रतिनिधी : जळगाव

महाराष्ट्रातील सत्तांताराचे मुख्य ठिकाण गुवाहाटी आणि 50 खोके यावरून; शिंदे-फडणवीस सरकारच्या समर्थनार्थ असलेल्या दोन अपक्ष आमदारांमध्ये सध्या वाद चालू असून, यानातर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूच्या आणखी दोन आमदारांमध्ये जुंपली असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे अपक्ष आमदार (शिंदे समर्थक) बच्चू कडू आणि आमदार रवी राणा (फडणवीस समर्थक) यांचातील वाद विकोपाला गेला असतानाच.! मंत्री गुलाबराव पाटील विरूद्ध आमदार चिमणराव पाटील असा नवा वाद समोर आलाय.

तर गुलाबराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देखील केली असून, आमदारांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिंदे गटासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामध्ये सांगण्यात आले होते की, राष्ट्रवादीच्या नेत्याला माझ्याविरोधात निधी दिला जात आहे. तर आता स्वत: मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याने; राज्याच्या राजकारणात आणखी नवीन काय घडणार का? याकडे लक्ष लागून आहे.