आणखी एक उद्योग गेला.! महाराष्ट्राला उद्योग नकोत का.? शिंदे फडणवीस सरकारच्या काळात 5 प्रकल्प राज्याबाहेर...

आणखी एक उद्योग गेला.! महाराष्ट्राला उद्योग नकोत का.? शिंदे फडणवीस सरकारच्या काळात 5 प्रकल्प राज्याबाहेर...

NEWS15 प्रतिनिधी : नागपूर

वेदांता - फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिसीन डिव्हाईस पार्क, आणि टाटा एअरबस नंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने; महाराष्ट्राला उद्योग नकोत का.? असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातून एकानंतर एक उद्योग जात असून, सरकार आणि विरोधक मात्र एकमेकांवर आरोप करण्यापलीकडे काहीही करत नाहीत. मागील काही महिन्यांचा विचार केला तर; शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एक दोन नव्हे तर अवघे 5 मोठ मोठे उद्योग राज्याबाहेर गेले आहेत.

वेदांता फायरफॉक्स पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प सुद्धा गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली. अशातच आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. पण, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे 1,185 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसंच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा देखील समावेश होता.  

महाराष्ट्र उद्योगात प्रगत राज्य असताना देखील एकापाठोपाठ एक उद्योग राज्यातून बाहेर जात आहेत. यामुळे राज्यातील बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुजरातला मिळालेला टाटा-एअरबस या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास बडोद्यात टाटा-एअरबस प्रकल्पाची पायाभरणी होईल. त्यामुळे गुजरातला लाखो रोजगार आणि हजारो कोटींची गुंतवणूक मिळणार आहे.