स्वारातीम विद्यापिठाला डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राची मान्यता.! तर डाॅ.नारायणराव कांबळे सर यांची समन्वयक पदी निवड...

स्वारातीम विद्यापिठाला डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राची मान्यता.! तर डाॅ.नारायणराव कांबळे सर यांची समन्वयक पदी निवड...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत मा. कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले यांच्या पुढाकारातून, मराठवाड्याचे भाग्यविधाते नांदेडचे सुपुत्र तथा माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री  डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून, नव्या पिढीला डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या विचार आणि कार्यांची ओळख करून दिली पाहिजे हा प्रमुख उद्देश आहे. यासाठी कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे.

यामध्ये डॉ.शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून प्रस्तुत विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे डॉ. अर्जुन भोसले यांची निवड केली आहे. त्यांच्यासोबत डॉ. प्रभाकर जाधव धर्माबाद, डॉ. विकास सुकाळे नांदेड, डॉ. शिवराज बोकडे नांदेड, डॉ. नारायण कांबळे शिरूर ताजबंद, संचालक विद्यार्थी विकास मंडळ, संचालक राष्ट्रीय सेवा योजना प्रस्तुत विद्यापीठ या सर्वांना सल्लागार समितीचे सदस्य म्हणून मा. कुलगुरू महोदयांनी नामनिर्देशित केले आहे. या सर्वांच्या उपस्थितीत मा. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन झालेल्या डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राची पहिली बैठक; दि. २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी संपन्न झाली.

या बैठकीत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम राबवत डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राला गतिमान करण्याच्या सूचना मा. कुलगुरू महोदयांनी सल्लागार समितीला दिलेले आहेत. असे डाॅ. नारायणराव कांबळे सर यांनी सांगितले.! त्यांच्या निवडीबद्ल आज मा.निवृत्ती कांबळे उपाध्यक्ष महेश बँक अहमदपूर, बालाजी कांबळे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन लातूर परिमंडळ, अभिजित कांबळे कनिष्ठ लिपिक कर्मयोगी तुळशीराम पवार महाविद्यालय हडोळती, महेंद्र कांबळे सहशिक्षक यांनी सत्कार केला.