राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी'च्या देहू शहर अध्यक्षपदी कु. सुदर्शन काळोखे पाटील यांची निवड...
![राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी'च्या देहू शहर अध्यक्षपदी कु. सुदर्शन काळोखे पाटील यांची निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_633fe3ec351a8.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : राजेश देवडकर
देहू : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची दि. 06 रोजी वडगाव मावळ येथे बैठक संपन्न झाली असता; यावेळी पक्षाच्यावतीने अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांना व युवकांना संधी देण्यात आली असून, नविन जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या देहु शहर अध्यक्ष पदी पक्षाचे युवा कार्यकर्ते कु.सदर्शन प्रदीप काळोखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती फौजिया खान, खा. सुप्रिया सुळे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, महीला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई चाकणकर व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी पक्षाच्यावतीने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीनंतर नवनियुक्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी देहु शहर अध्यक्ष कु. सुदर्शन प्रदीप काळोखे यांनी म्हंटले की.! पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण नवनवीन संकल्प राबवून, पक्ष मावळ मतदारसंघात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच पक्षाच्या माध्यमातून युवक आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष समीर कदम यांच्यासह देहू शहर अध्यक्ष विकास कंद, कार्याध्यक्ष सोमनाथ चव्हाण, युवक शहर अध्यक्ष शिवाजी टिळेकर, देहू माजी उपसरपंच अभिजित काळोखे, माजी उपसरपंच सचिन साळुंके, उमेश हगवणे, गोविंद झंजे, शुभम चव्हाण, आप्पा जाधव, देवा झेंडे, संकेत शिंदे, ओंकार काळोखे, राजेश पवार आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.