राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत.? कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याने, डिलीव्हरी बॉयला अटक...

राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत.? कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याने, डिलीव्हरी बॉयला अटक...

NEWS15 प्रतिनिधी : पवई

कधी, कुठे आणि कशी / काय घटना घडेल याचा काही नेम (अंदाज) नाही. कारण.! आत्तापर्यंत आपण या राज्यात महिला, मुली, लहान मुलं किंव्हा समलैंगिक व्यक्ति सुरक्षित नसल्याची घटना ऐकली असले. परंतु, मागील काही दिवसांपासून  लैंगिक अत्याचाराच्या अनोख्याच घटना समोर येत असून, राज्यात आता मुके प्राणी देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न मुंबईतील एका घटनेने समोर आला आहे.

काही महिन्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील गोठणे बीटा येथील सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये एका घोरपडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली; त्यानंतर राज्यात पुन्हा: गाईवर आणि कोंबडीवर अत्याचाराची घटना घडली.! आणि अट्टा एका कुत्र्यावर  लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

पोलिसांनी मुंबईमध्ये कुत्र्यासोबत सेक्स केल्याप्रकरणी एका डिलीव्हरी बॉयला अटक केली असून, या प्रकरणाचा व्हिडीओ करून एका व्यक्तीने प्राण्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेला पाठवला होता.! त्यानंतर, पवई पोलिसांनी कारवाई करत;  फूड डिलीव्हरी बॉय आकाश मोरे (वय 28 ) याला अटक केली आहे. आरोपी अनेक दिवसांपासून कुत्र्यासोबत सेक्स करत होता. मॉलमध्ये सेक्स करत असतानाचा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट केला आणि प्राणी हक्कांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेला पाठवला. त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. बॉम्बे अॅनिमल राइट्स असं या स्वयंसेवी संस्थेचं नाव असून, या संस्थेच्या सदस्यांनी ही तक्रार दाखल केली.