आखाडा बाळापूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश...

आखाडा बाळापूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्याचा, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश...

NEWS15 प्रतिनिधी : नारायण काळे

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष आमले यांनी आज  वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आला असून, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे रविंद्र वाढे जिल्हाकार्यकारी अध्यक्ष, डॉ.दिपक डोनेकर जिल्हा महासचव, ज्योतीपाल रणवीर जिल्हा सचिव, माणिकदादा पंडित, प्रवन जोंधळे, बबन भुक्तर, भुषण पाईकराव, आमोल वाढे, भिमराव शुर्यतळ, संकेत सुरळकर उपस्थित होते.

तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे गाव तेथे शाखा स्थापन करण्यावर चर्चा झाली. तसेच तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्याबाबत चर्चा झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष आमले रविंद्र वाढे जिल्हाकार्यकारी अध्यक्ष, डॉ.दिपक डोनेकर जिल्हा महासचव, ज्योतीपाल रणवीर जिल्हा सचिव, माणिक पंडित यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला.