"व्हॉईस ऑफ मीडिया" च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची नियुक्ती...
!["व्हॉईस ऑफ मीडिया" च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी गजानन देशमुख यांची नियुक्ती...](https://news15marathi.com/uploads/images/202211/image_750x_6380471a61057.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : नारायण काळे
परभणी : 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गजानन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून, पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यात देखील ते अग्रसर आहेत. तर या निवडीबद्दल देशमुख यांचे सर्व स्तरांतून स्वागत/अभिनंदन केले जात आहे. 'व्हॉईस ऑफ मीडिया' ही संघटना पंचसूत्री घेऊन, पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून जिल्हाभर पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीची चळवळ उभारू असे मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
'व्हॉईस ऑफ मीडिया' ही संघटना देशातल्या २१ राज्यात कार्यरत आहे. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या हितासाठी लढणाऱ्या या संघटनेत परभणी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. 'व्हॉईस ऑफ मीडिया' या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला आणि संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन, देशमुख यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले आहे. संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या पत्रकारांनी गजानन देशमुख यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे. लवकरच संघटनेची जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.