नाशिक जिल्हा बँकेत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवा.! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यामंत्र्यांकडे मागणी...
![नाशिक जिल्हा बँकेत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवा.! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यामंत्र्यांकडे मागणी...](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_6388507226dd3.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
दिंडोरी / नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत नाशिक जिल्हा बँके संदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेत राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा बँकेत साधारण 62000 शेतकऱ्यांचे 1400 कोटी रुपये थकीत असून, या शेतकऱ्यांचे सर्व व्यवहार बँकेने बंद केले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई बँक करत आहे. परंतु, हे शेतकरी सरकारच्या चुकीचे धोरण, नोटबंदी, बँकेचे चुकीचे व्याजदर यामुळे थकीत झाले असल्याची बाब राजू शेट्टीनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिली.
या शेतकऱ्यांना बँकेच्या पाशवी कर्जातून मुक्त करायचे असेल तर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएस योजना राबवण्याचा आदेश तात्काळ मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा बँकेला द्यावा.! किंवा या बँकेला स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी यावेळेस राजू शेट्टी, संदीप जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तर या मागणीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील दुजारा दिला असून, आम्ही या बाबत सकारात्मक निर्णय करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.