कर्मयोगी'चा वारसदार आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामधून सोन्याचा धूर काढणार : पाटील गटाचे प्रवक्ते संतोष बापू पाटील
![कर्मयोगी'चा वारसदार आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामधून सोन्याचा धूर काढणार : पाटील गटाचे प्रवक्ते संतोष बापू पाटील](https://news15marathi.com/uploads/images/202211/image_750x_6387142776d7f.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : कर्मयोगी स्वर्गीय गोविंद बापू पाटील यांनी.! करमाळा तालुक्यामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने विकास मंदिर शेलगाव भाळवणी'च्या माळरानावर उभा केले. तब्बल 23 वर्षे पायामध्ये चप्पल घातली नाही. आपल्या स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता; करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अहोरात्र प्रयत्न करून, आदिनाथ सहकारी साखर कारखाना मोठ्या प्रयत्नाने उभा केला. कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या चांदीच्या पादुका देऊन राष्ट्रवादीचे सर्वे सर्वाश्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला.
परंतु, काही नथभ्रष्ट राजकीय स्वार्थी पुढाऱ्यांनी अभद्रयीती करून, बापूंच्या ताब्यातील कारखाना विरोधकांकडे गेला आणि भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. कारखाना रसा तळाला नेला. काही मंडळींनी बारामती ऍग्रो'ला भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला. परंतु, जनतेचे आमदार नारायण आबा पाटील यांनी त्यांचा डाव हाणून पाडला. 2014 ला करमाळा विधानसभेमध्ये आमदार झाल्यानंतर काय विकास असतो तो; आमदार नारायण आबा पाटील यांनी दाखवून दिला. करमाळा तालुक्यातील रस्त्यांची कामे प्रलंबित होती. ते संपूर्ण रस्ते गुळगुळीत व खड्डे मुक्त करून रोड किंग तालुक्यातील जनतेने त्यांना उपाधी दिली. कुकडी धरणा मधून कॅनेलद्वारे आबांच्या काळामध्ये 18 ते 20 वेळा आवर्तने आणली. दिवाळी दिवशी सुद्धा कॅनल वरती दिवाळी साजरा करणारा महाराष्ट्रातील पहिला आमदार म्हणून व पाणीदार आमदार म्हणून संबोधले जाऊ लागले. 23 वर्ष दहिगाव उपसा सिंचन योजना रखडली होती. आबांनी सतत पाठपुरावा करून दहिगाव उपसा सिंचन त्यांच्या कार्य काळामध्ये चालू केली. दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्र ओलीता खाली आणले.! करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबांना वैयक्तिक लाभाच्या योजना संपूर्ण महाराष्ट्रमध्ये करमाळा तालुक्याला जास्त मिळवून दिल्या. करमाळा तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारे व सतत जनतेच्या संपर्कात असणारे एकमेव आमदार म्हणून नारायण आबा पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विद्यमान लोकप्रतिनिधी आठवडी बाजारी आमदार म्हणून फक्त शुक्रवारी करमाळ्यामध्ये दोन ते तीन तास उपलब्ध असतात. परंतु, जनतेचे आमदार नारायण आबा पाटील हे दिवसातील 16 ते 17 तास जनतेच्या प्रश्नासाठी उपलब्ध असतात.
जे खटले कोर्ट कचेरी मध्ये सुटत नाहीत ते प्रश्न व वाद आमदार नारायण आबा पाटील यांचे बंधू राजन पाटील यांच्या जनता दरबार मध्ये सोडवले जातात. करमाळा पंचायत समितीच्या माध्यमातून डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अतुल भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आदर्श कारभार पंचायत समितीचा करून, गोरगरिबांचे प्रश्न जागचे जागी सोडवले जायचे नम्रता सहनशीलता हे अतुल भाऊ यांच्या अंगी असल्यामुळे, करमाळा तालुक्यातील जनतेला आपल्या वाटणारे नेतृत्व म्हणजेच अतुल भाऊ पाटील. करमाळा माढा मतदार संघातील जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करून गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सामील होणार युवा नेतृत्व पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या रूपाने मिळालेले आहे. करमाळा तालुक्यातील युवकांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे.