युवा उद्योजक प्रमोद आलुगडे यांना महाराष्ट्र बिजनेस 2022 पुरस्कार प्रदान.!

युवा उद्योजक प्रमोद आलुगडे यांना महाराष्ट्र बिजनेस 2022 पुरस्कार प्रदान.!

NEWS15 प्रतिनिधी - राजेश देवडकर

पिंपरी चिंचवड : रीसिल इन इंडिया मार्केट अँड रिसर्च यांच्यावतीने महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2022 नुकताच नाशिक येथे 07 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला आहे. यावेळी राज्यातील उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या अनेक मान्यवरांचा; राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे येथील वॉटर प्युरिफायर क्षेत्रात अत्यंत कमी कालावधीत अग्रगण्य ठरलेल्या सुपर अॅक्वा सर्विसेस कंपनीला.! राज्यस्तरीय महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड 2022 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. कंपनीतर्फे सुपर अॅक्वा सर्विसेसचे डायरेक्टर प्रमोद आलुगडे आणि वैभव पवार यांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

सुपर अॅक्वा सर्विस हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून घरगुती आणि व्यवसायिक क्षेत्रात वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम बनवणे आणि बसवणे व इतर सेवा देत असून, सुपर अॅक्वा सर्विसेसचे राज्यातील अनेक भागात दहा हजार पेक्षा अधिक आनंदी ग्राहक जोडले गेले आहेत. तर राज्यातील अनेक ग्रामपंचायत, शासकीय/प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी देखील सुपर अॅक्वा सर्विसेस ने आपली सेवा दिली आहे.  

सुपर अॅक्वा सर्विसेसमध्ये.! वॉटर ATM,  व्यावसायिक RO प्लांट, अल्कलाइन वॉटर प्लांट तसेच घरगुती मशनरी बसवणे आणि देखभालीचे काम केले जाते. याशिवाय सुपर अॅक्वा सर्विसेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक प्रॉडक्टची सेवा देत असून, Enagic kangen वॉटर अल्कलाइन मशीनचे पुण्यातील अधिकृत डीलर आहेत. तसेच आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कंपनीचे शंभर पेक्षा अधिक विक्रेते आहेत. कोरोना काळानंतर अनेक व्यवसायांची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना; सुपर अॅक्वा सर्विसेस त्या काळातही आणि त्यानंतरही आपली भरारी घेतच राहिली आहे. याच व्यवसायिक कार्याचा आढावा आणि दखल घेऊन.! त्यांना "वन ऑफ द बेस्ट अॅक्वा प्युरिफायर मशीन मनुफॅक्चरींग कंपनी इन हा महाराष्ट्रा 2022 बिजनेस अवॉर्ड देण्यात आला आहे.