अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांकडून पैशांची मागणी? शिंदे-फडणवीस सरकारवर घेतली राजू शेट्टिंनी शंका...

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांकडून पैशांची मागणी? शिंदे-फडणवीस सरकारवर घेतली राजू शेट्टिंनी शंका...

N15 प्रतिनिधी - पुणे

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप; तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून करण्यात आला होता. तर या आरोपाखाली राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असून, जेल वारी झाली. परंतु, हा काळाबाजार थांबला नसून; शिंदे फडणवीस सरकारमध्ये देखील अधिकार्‍यांच्या बादल्यांसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर शंका उपस्थित केली आहे.

राज्यात मंत्र्यांनी बदल्यांची दुकानदारी मांडल्यामुळेच; अधिकारी शेतकऱ्यांना लुबाडू लागले आहेत.! असे राजू शेट्टी यांनी #FaceBook पोस्टद्वारे म्हटले आहे.

मागील सरकारच्या काळात भाजप नेत्यांनी याच मुद्द्यावरुन सरकारविरोधी प्रहार करत; रान उठवले होते. आता तेच आरोप सत्ताधारी मंत्र्यांवर होत असल्याने, आता राज्य सरकारकडून राजू शेट्टी यांच्या या आरोपाला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या लक्ष लागून आहे. 

https://www.facebook.com/Rajushetti27/posts/pfbid0HgeJQe1hoWXZe23Ci4jN3Gad3Lt1qSChMNDb959ZexGu1CKzsnzVT2tRX1SKuSdcl