महागाईपासून किरकोळ दिलासा.! LPG सिलिंडरच्या दरात ११५.५० रुपयांची कपात...

महागाईपासून किरकोळ दिलासा.!  LPG सिलिंडरच्या दरात ११५.५० रुपयांची कपात...

NEWS15 रिपोर्ट - नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या किंमतीत कपात करण्यात आली असून, महागाईपासून किरकोळ दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. सरकारने LPG सिलिंडरच्या दरात ११५.५० रुपयांची कपात केली असून, ही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. तर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ६ जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

तर सरकारच्या या निर्णयानुसार;  देशातील प्रमुख शहरांमधील नवे दर पाहूया.!

1. दिल्ली - व्यावसायिक LPG सिलिंडर १७४४ रुपये,

2. कोलकत्ता - व्यावसायिक LPG सिलिंडर १८४६ रुपये

3. मुंबई - व्यावसायिक LPG सिलिंडर १६९६ रुपये 

4. चेन्नई - व्यावसायिक LPG सिलिंडर १८९३ रुपये

एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एपलीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात होत असताना घरगुती सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणतेही बदल होताना दिसत नाहीत. तर यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात २५.५ रूपयांची कपात केली होती.