विरोधी पक्षनेते अजित पवार आणि 76 संचालक पुन्हा ईडीच्या टार्गेटवर.! राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी होणार?

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि 76 संचालक पुन्हा ईडीच्या टार्गेटवर.! राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी होणार?

प्रतिनिधी : मुंबई

राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. घोटाळ्याप्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्याने, ही चौकशी नव्याने सुरु होण्याची शक्यता आहे. 

प्राप्त माहितीनुसार; तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचे प्रकरण पुन्हा रडारवर आहे. मविआ शासनाने दाखल केलेल्या क्लोजर अहवालानंतर काही जनहित याचिका दाखल झाल्या असल्याने, त्याला उत्तर देताना आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्याचे लेखी कळवले आहे. त्यानुसार अजित पवार, शरद पवार यांच्या भूमिकेचे चौकशी करण्याची मागणी याचिकांत होती. त्यांची चौकशी न करताच क्लोजर अहवाल दिला असल्याचे सांगितले जाते. या कथित घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ७६ जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगून प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केला होता. मात्र, या अहवालावर आता मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी निषेध याचिका दाखल केल्यामुळे ED अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

ईडीने कोर्टात सादर केलेल्या अहवालात पुरावे असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्याचे आदेशही कोर्टाकडून करण्यात आले होते. त्यानंतर 18 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.