पुन्हा: CNG ची दरवाढ ; मध्यरात्रीपासून दर लागू.! पुणेकरांना परत CNG साठी मोजावे लागणार जास्त पैसे...

पुन्हा: CNG ची दरवाढ ; मध्यरात्रीपासून दर लागू.! पुणेकरांना परत CNG साठी मोजावे लागणार जास्त पैसे...

प्रतिनिधी - राजेश देवडकर

पुणे : राज्यातील जनता आधीच महागाईच्या झळा सोसात असून, यात आता विशेषत: पुणेकरांना अधिकचा महागाई दणका बसणार आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट असल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता CNG चे दर वाढले असल्याने, CNG वापरणाऱ्या पुणेकरांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.

पुण्यात सीएनजी दरात प्रति किलो मागे 1 रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता CNG 92 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने मध्यरात्रीपासून हे दर लागू केले आहेत.

पुण्यातील CNG दराचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, पुण्यात 1 एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचा दर ६२.२० रुपये होता. तर एप्रिल पासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात 34 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजे पेट्रोल नंतर बहुतेक CNG सुद्धा शतक करण्याच्या तयारीत आहे.

तर मागील महिन्यातच सीएनजी गॅसच्या दरात 4 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक रुपयाची दरवाढ करण्यात आल्याने; दोन महिन्यात 5 रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.  त्यामुळं सीएनजी दरवाढीचा फटका पुण्यातील सामान्य वाहन चालक, रिक्षा चालकांना अधिक बसणार आहे. आधीच महागाईचा मार बसत असताना आता दुसरीकडे दरवाढीने खिशाला कात्री बसणार आहे.