अमरावती विद्यापीठ सिनेटच्या चुरशीच्या निवडणुकीत राम देवसरकर विजयी...
![अमरावती विद्यापीठ सिनेटच्या चुरशीच्या निवडणुकीत राम देवसरकर विजयी...](https://news15marathi.com/uploads/images/202211/image_750x_63804462c7283.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : किरण मुक्कावार
यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत; व्यवस्थापन सदस्य प्रतिनिधी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती आणि यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ देवसरकर विजय झाले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळासह अनेक प्राधिकरणाची निवडणूक रविवारी 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत रामभाऊ देवसरकर यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात उभे होते. तर चुरसीच्या रनसंग्रामात रामभाऊ देवसरकर हे विजयी झाले आहेत.
विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि व्यवस्थापनाचे विविध प्रश्न व समस्या सिनेटच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे; रामभाऊ देवसरकर यांनी सांगितले. विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेचे संलग्न विद्यालय, महाविद्यालयातील प्राचार्य उपप्रचार्य पर्यवेक्षक मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांनी रामभाऊ देवसरकर यांचे अभिनंदन केले.