तर अधिकार्‍यांची एका दिवसात बदली करू.! राज्याचे महसूल मंत्री कोण? सुजय विखे की, राधाकृष्ण विखे पाटील...

तर अधिकार्‍यांची एका दिवसात बदली करू.! राज्याचे महसूल मंत्री कोण? सुजय विखे की, राधाकृष्ण विखे पाटील...

NEWS15 प्रतिनिधी : अहमदनगर

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नेमके कोण? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असून; खासदार सुजय विखे पाटील हे.! राधाकृष्ण विखे पाटील यांच्या महसूल विभागात ढवळाढवळ करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्यातील महसूल विभाग भ्रष्टाचार मुक्त असून, कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्यांकडे कामासाठी पैसे मागितले तर त्या अधिकाऱ्यांची आपण एका दिवसात बदली करू; असा इशारा त्यांनी दिला आहे. तर अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार सुजय विखे यांना कोणी दिला असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत असून; त्यांच्या या अशा वक्तव्यांमुळे राज्याचे महसूल मंत्री नेमके कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत; भाजपमध्ये सामील झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे नवे महसूल मंत्री आहेत.! मात्र गेल्या काही दिवसांपासून खासदार सुजय विखे यांनीच या पदाचा पदभार घेतल्या की काय अशी चर्चा; नगर जिल्ह्यात जोर धरू लागली असून, याआधी'ही खासदार सुजय विखे यांनी नगर येथे महसूल विभागात संदर्भातील बऱ्याच विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या नव्या वक्तव्यावरून त्या चर्चेना अधिकच बळ मिळाले आहे.

काय म्हणाले खा. सुजय विखे...! जिल्ह्यातील वयोवृद्ध व्यक्तींना शासकीय लाभ मिळवण्यासाठी, गरिबांना रेशन काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना खातेफोड करण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही. पुढच्या 6 महिन्यात हे शासकीय अधिकारी तुमच्या दारात येतील आणि तुमची रखडलेली कामे पैशांशिवाय पूर्ण करतील.! कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले तर माझ्याकडे या; आपण त्या अधिकाऱ्याची एका दिवसात बदली करू... असे वक्तव्य खासदार विखे यांनी केले आहे. त्यामुळे या चर्चा जोर धरू लागल्यात.