सामाजिक कार्यकर्ते अमित जगाते ह्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा...
![सामाजिक कार्यकर्ते अमित जगाते ह्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा...](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_63899ec3e4030.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : सामाजिक बांधिलकी असणारे ग्राम कोळगाव'चे ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अमित भैय्या जगाते यांनी.! त्यांची कन्या मनस्वी हिचा पहिला वाढदिवस एका आदर्शवादी पद्धतीने साजरा केला आहे. कोविड काळात ज्यांनी आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता; कोवीड सारख्या जीवघेण्या आजाराला न घाबरता लोकांची सेवा केली, त्यातील एक प्रमुख घटक म्हणजे खेड्या-पाड्यातील आशा वर्करस्.! ह्यांच्या सन्मानार्थ त्या महिलांना साडी वाटप करून, आपल्या सामाजिक बांधिलकीची आणी सामाजिक कार्याची पोचपावती दिलेली आहे. व या समाजउपयोगी कार्यातूनवाढदिवस साजरा केला.