रवी राणा आणि बच्चू कडूंचा वाद मिटताच; तृतीयपंथी समाज आक्रमक.! बच्चू कडू यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन...

NEWS15 प्रतिनिधी - धुळे
गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला बच्चू कडू आणि रवी राणा वाद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्तीनंतर मिटला असून, बच्चू कडू यांच्यासमोर नवीन एक अडचण समोर आले आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरल्याचे सांगत; धुळ्यातील तृतीयपंथी समाज आक्रमक झाला आहे. तर तृतीयपंथीय समाजाने शमिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आंदोलन चालू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले असून, बच्चू कडू यांनी तृतीयपंथीयांची माफी मागावी तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान न देता; तसं केल्यास मुख्यमंत्र्यांच्या दालना बाहेर टाळ्या पिटून आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या निरीक्षक शमीभा पाटील यांनी दिला आहे.
रवी राणा यांना प्रतिउत्तर देताना; काय म्हणाले होते बच्चू कडू.! राणा यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करावेत, हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्या घरी जाऊन मी भांडी घासेन, तसेच हे आरोप सिद्ध न झाल्यास मी त्यांना हिजडा समजेन, अशा प्रकारचे वक्तव्य बच्चू कडू यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होत. त्याचाच आक्षेप नोंदवत आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.