धुळे जिल्ह्यात केंद्रीय पथक येण्याअगोदर; स्वखर्चाने साक्री ग्रामीण रुग्णालय होत आहे चकाचक.! कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन रुग्णालयाची रंग रंगोटी.?

धुळे जिल्ह्यात केंद्रीय पथक येण्याअगोदर; स्वखर्चाने साक्री ग्रामीण रुग्णालय होत आहे चकाचक.! कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन रुग्णालयाची रंग रंगोटी.?

NEWS15 प्रतिनिधी :  खंडेराव पवार

धुळे :  11 ऑक्टोंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर केंद्रीय कमिटीचे पथक पाहणीसाठी येत असल्याने; साक्री ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी स्वखर्चाने रुग्णालयात साफसफाई, नवीन बेड, नव्या गाद्या, इमारतील रंगकाम आणि इतर कामे होत आहे.

विशेष म्हणजे येथील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी स्वखर्चाने रुग्णालयाची रंगरंगोटी करत आहे आहेत. परंतु, जर हे सर्व स्वखर्चाने चालू आहे तर; रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी / रंगकाम करण्यासाठी रुग्णालया प्रशासनाकडे निधी उपलब्ध नाही का? शासन निधि देत त्याचं काय झालं? वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पैसे घेऊन केंद्रीय पथकासमोर रुग्णालयाचा देखावा सादर करण्यात येणार आहे की; आणखी काही गोड बंगाल आहे. हा प्रश्न एखाद्या सामान्य नागरिकाला पडल्याशिवाय राहणार नाही.

तर ते काही का.! असेना मात्र, केंद्रीय पदकाच्या पाहणी मुळे साक्री ग्रामीण रुग्णालय एखाद्या खाजगी रुग्णालयासारखे चकाचक दिसेल तेवढे खरे.! शेवटी या सर्व प्रकारामुळे असे वाटते की केंद्रीय पथकाच्या टीमने वर्षातून दोनवेळा तरी रुग्णालयाची पाहणी करावी; जेणेकरून त्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार व सुविधा मिळू शकतील.