PFI ची उघड धमकी.? मोदी, शहा, योगी आणि शरद पवार सह ठाकरे टार्गेटवर.! आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचं पत्र...
![PFI ची उघड धमकी.? मोदी, शहा, योगी आणि शरद पवार सह ठाकरे टार्गेटवर.! आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचं पत्र...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63412c7abac0a.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : सोलापूर
देशविरोधी कृत्यांच्या तयारीत असलेल्या ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घालण्यात आली असता; या संघटनेच्या एका कार्यकर्त्याने चक्क पत्र लिहून सोलापूरमच्या भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकी देण्यात आली असून, मोहम्मद शफी बिराजदार नामक सोलापुरातील एका व्यक्तीने हस्तलिखित पत्र पाठवत ही धमकी दिली आहे.
तर या पत्रात नमूद केल्यानुसार.! पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असा उल्लेख पत्रात केला असून.! अयोध्या, मथुरा, काशी या ठिकाणी आमचे ‘सुसाईड बॉम्बर’ एका दिवसात उडवतील, अशीही धमकी देण्यात आली आहे.
सोलापूरमच्या भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकी पत्रामध्ये म्हटलंय की, तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे. त्याचबरोबर अयोध्या, काशी, मथुरेत आमचे सुसाईड बॉम्बर एका दिवसात उडवून दहशत माजवतील. आम्ही मुसलमान आहोत, अशी धमकीही या पत्रात दिली आहे. याशिवाय पत्रात म्हटले आहे की, तुम्ही PFI वर बंदी आणून चुकीचे काम केले. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
दरम्यान या धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शहर गुन्हे शाखेने सदर पत्रातील नमूद पत्ता आणि परिसरात व्यक्तीचा शोध घेतला. पण, त्या नावाची कोणीही व्यक्ती नसल्याची बाब समोर आली. तरीही खोडसाळपणा केला की दुसऱ्याच्या नावाने कोणी पत्र लिहिले की ते खरेच संघटनेशी संबंधित कोणी पाठविले, या बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.