आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर; सरप्राइज भेट आणि थोडक्यात डॉक्टरच्या निलंबनाची कारवाई टळली...
![आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर; सरप्राइज भेट आणि थोडक्यात डॉक्टरच्या निलंबनाची कारवाई टळली...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_633ff35300130.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड
पुणे : डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राज्याला प्रचीतीत असलेले आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे हे; पुन्हा: एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वी राज्यातील अनेक IAS अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असता; यात तुकाराम मुंढे यांचंही नाव असून, मुंढे यांना आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर मुंढे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारतच आपल्या शिस्तीने कामावर छाप टाकण्याचा प्रयत्न केला असून, त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील आळंदी वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकण्यात आली असता; रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली होती.! मात्र या ठिकाणी डॉक्टर उपस्थित असल्याचे निदर्शनात आल्यानंतर ही कारवाई टळली आहे. म्हणजे सरप्राइज भेट आणि थोडक्यात डॉक्टर वाचले.
तर दुसरीकडे तुकाराम मुंढे यांचा स्थानिक जिल्हा असलेल्या; बीड जिल्ह्यातही शिस्तीचे धडे तेथील आरोग्य अधिकारी गिरवाय लागले असून, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी आदेश जारी करत.! कर्मचाऱ्यांनी कार्यालयात नेमून दिलेल्या गणवेशात यावे, जीन्स/टी-शर्ट घालू नका.! अन्यथा सरप्राईज व्हिजिटमध्ये सापडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे अनेक विभागात आपली छाप सोडल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागात देखील आपल्याच स्टाइलने कामाला सुरुवात केल्याने, राज्याची आरोग्य व्यवस्था आता सुधारणार अशी अपेक्षा नागरिक करू लागले आहेत.