उदयनराजे राज्यपालां'विरोधात अधिक आक्रमक.! आझाद मैदानावर आंदोलन करणार - उदयनराजे
![उदयनराजे राज्यपालां'विरोधात अधिक आक्रमक.! आझाद मैदानावर आंदोलन करणार - उदयनराजे](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_638b201d4f261.jpg)
NEWS15 प्रतीनिधी : रायगड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अभद्र आणि बेताल वक्तव्य केल्याने, याविरोधात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. त्यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. तर काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
राज्यपाल पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने जर अशाप्रकारे वक्तव्य केलं असेल तर गप्प बसणार का? आझाद मैदान फार लांब नाही, लवकरचं एक तारीख ठरवून मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढणार अशी घोषणा खासदार उदयनराजे यांनी केली आहे.
‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे आज रायगडावर दाखल झाले असता; राज्यपालांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “शिवाजी महाराज एकमेव असे राजे होते.! ज्यांनी राज्यकारभारात सगळ्यांचा सहभाग व्हावा अशी कल्पना मांडली. शिवाजी महाराजांच्या सन्माला कलाटणी दिली जाते, त्याला दुजोरा दिला जातो. आपण पाहत असतो प्रत्येकजण प्रतिक्रिया देणार. हीच आपली चूक झाली. असं उदयनराजे म्हणाले.
राज्यात राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे, त्यामुळे ते सगळं गृहित धरतात .राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर अनेकांची खिल्ली उडवली जाते आणि आपण पाहत राहतो. त्यामुळे आता आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. आंदोलनाची तारीख मात्र अद्याप सांगितलेली नाही.