पुणे जिल्हा न्यायालयाचा महिला वकिलांसाठी अनोखा निर्णय.! कोर्टात केस विचरू (निट) करू नका...
![पुणे जिल्हा न्यायालयाचा महिला वकिलांसाठी अनोखा निर्णय.! कोर्टात केस विचरू (निट) करू नका...](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63578843033a7.jpg)
प्रतिनिधी - पुणे
पुणे जिल्हा न्यायालयाने महिला वकिलांसाठी एक अजबच फतवा जारी केल्याने; सध्या सोशल मीडियावर न्यायालयाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. न्यायालयाने याबाबत काढलेल्या नोटीसीध्ये लिहिण्यात आले आहे की "हे वारंवार निदर्शनास आलं आहे की महिला वकील अनेकदा कोर्टामध्येच आपले केस व्यवस्थित करत असतात. हे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणणारे किंवा विचलित करणारे असे आहे.
त्यामुळे महिला वकिलांना अशी कृत्यं न करण्याचा सल्ला याद्वारे दिला जात आहे.! असे नोटिशीमध्ये लिहिण्यात आले होते. तर पुणे जिल्हा न्यायालयाच्या या नोटीसचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून, हा आदेश २० ऑक्टोबर रोजी देण्यात आला. मात्र; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर ही नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मिळालेल्या माहितीनुसार.! नोटीसचा हेतू केवळ न्यायालयीन कामकाजाचा डेकोरम राखण्यासाठी आहे. भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/IJaising/status/1584217952114483200?s=20&t=byRXowPwqXWdFuIANxU9mQ