प्रत्येक गरजूचे घराचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार समीर कुणावार
![प्रत्येक गरजूचे घराचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार समीर कुणावार](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_63425e625e228.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : अमोल झाडे
वर्धा / समुद्रपूर : प्रत्येक गावात खेड्यात अजूनही जागेमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे; घर बांधू शकत नाही.! त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेव्हा असल्या गरजूचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने त्यांना जागेचे पट्टे नियमित करून, वाटप केले या पुढे त्याच्या अडचणी दूर करू असे मत आमदार समीर कुणावार यांनी महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.
पंचायत समिती समुद्रपूर येथे महा आवास अभियान पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमचे अध्यक्ष आमदार समीर कुणावार होते तर; प्रमुख अतिथी म्हणून माजी उपसभापती योगेश फुसे, माजी जि.प. सदस्य रोशन चौखे, माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, गटविकास अधिकारी रोषणकुमार दुबे, गटशिक्षणाधिकारी भास्कर साखरकर उपस्थित होते.
यावेळी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रथम पुरस्कार कांढळी ग्रामपंचायत'ला, द्वितीय भोसा ग्रामपंचायत, तृतीय उब्दा'ला प्राप्त झाला तर.! सर्वोत्कृष्ट घरकुल सौ. अर्चना चौधरी शेडगावं, द्वितीय सौ. सुशीला भगत साखरा, तृतीय प्रियंका कसारे धोंडगाव, राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम धामणगाव ग्रामपंचायत, द्वितीय गिरड, तृतीय तास ग्रामपंचायतला प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट घरकुल प्रथम पुरस्कार शोभा मून वायगाव हळद्या, द्वितीय सौ. निर्मला तामगाडगे, तृतीय सौ. लताबाई शेंडे लाहोरी तर सर्वोत्कृष्ट क्लस्टर कोरा आशिष पांडे याना व जाम येथील सागर फिरंगी याना प्राप्त झाला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण भगत यांनी केले तर; आभार विस्तार अधिकारी मुरार यांनी मानले. यावेळी सरपंच रोशन पांगुळ, मुरलीधर चौधरी, अंकुश खुरपुडे, बलराम राऊत, उत्तम घुमडे, नगरसेवक प्रा. मेघश्याम ढाकरे, शेषराव तुळणकर, राम काळे, रजत भुरे, प्रफुल्ल कुडे उपस्थित होते.