जय मल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. अविनाश गाडे यांची निवड; श्री. रुपेश खंडागळे व्हा. चेअरमनपदी विराजमान

जय मल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सोसायटीच्या  चेअरमनपदी श्री. अविनाश गाडे यांची  निवड; श्री. रुपेश खंडागळे व्हा. चेअरमनपदी विराजमान

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

जय मल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. अविनाश गाडे यांची निवड करण्यात आली असून, व्हा. चेअरमनपदी श्री. रुपेश खंडागळे यांची निवड झाल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेच्या नव्या नेतृत्वाकडून सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेचा कारभार अधिक सक्षमपणे पुढे नेला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद तसेच हितचिंतकांनी नवनियुक्त चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन केले आहे.

जय मल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नव्या नेतृत्वाला सभासद व ग्रामस्थ याच्या कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा!