भारतीय महिला मोर्चा पार्टीच्यावतीने जयश्री शिंदे हत्या प्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनला निवेदन...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
उरण येथे जयश्री शिंदे घडलेल्या हत्याप्रकरणी; दिंडोरी येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने दि. ३० रोजी दुपारी दिंडोरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला कोणीही पाठीशी घालू नये. सतत होत असणाऱ्या या घटनांना आळा घातला पाहिजे याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरशसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे ज्येष्ठ नेते प्रमोद देशमुख, नितीन गांगुर्डे,निकिता भामरे,निलेश गायकवाड,मोहन देशमुख,महेश काळे विजय कराटे, संध्या निरगुडे सविता महाले संगीता भिवंडी मनोज कदम आदींसह भाजपाचे अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.