१४ फेब्रुवारी'ला होणाऱ्या पायी मूक मोर्चा'ला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - आप्पासाहेब शिंदे

१४ फेब्रुवारी'ला होणाऱ्या पायी मूक मोर्चा'ला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - आप्पासाहेब शिंदे

प्रतिनिधी - बीड

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत ट्रेनिं शिक्षक; या शासन निर्णयाच्या अधीन राहून शासन निर्णयाच्या शैक्षणिक अहरतेनुसार पात्र व पूर्ण वेळ शाळेवर कार्यरत असून, शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी फेब्रुवारी 2025 मध्ये संपत आहे.

तरी आमचा कार्यकाळ शैक्षणिक वर्षाला अनुसरून शैक्षणिक एक वर्षा करिता वाढवण्यात यावा व वेतन वाढ करण्यात यावी.!  पंधरा टक्के आरक्षण जागा ठेवण्यात यावी अशा प्रमुख मागण्याद्वारे बीड जिल्ह्यातील शिक्षक येत्या 14 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय व कौशल्य विभागावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

तरी बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अप्पा शिंदे यांच्यावतीने करण्यात आले आहे.