कादवा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ पार

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
कादवा ने यंदा ऊस तोडीचे योग्य नियोजन केले असून यंदा सुमारे साडे चार ते पाच लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.तसेच या हंगामात पूर्ण क्षमतेने इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे असे प्रतिपादन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर कारखान्याच्या ४८ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीराम शेटे म्हणाले की, साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.ऊस हे शाश्वत पीक असून, सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करावी असे आवाहन केले.यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू असून त्यादृष्टीने आपण ही कारखान्यास सर्वोतोपरी सहकार्य करत असून शेतकऱ्यांना वीज पाणी रस्ते आदी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.खासदार भास्कर भगरे यांनी कादवाचे भरभराटीसाठी सर्वांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कारखान्याला ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले.यावेळी युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार प्रयत्नशील राहतील असे सांगतील.
बॉयलर अग्निप्रदीपण शुभारंभ सभासद सौ व श्री.नवनाथ बाबुराव लोखंडे लोखंडेवाडी,सौ व श्री.माधव सिताराम कड जोरण,सौ व श्री.विलास दादाजी जाधव - करंजवण,सौ व श्री.संजय माधव भालेराव - तिसगाव दिं.सौ व श्री.नामदेव कारभारी पगार - वाघदर्डी यांच्या शुभहस्ते पार पडला.
याप्रंसगी बाकेराव पाटील गणपतराव पाटील, त्र्यंबकराव संधान,बाळासाहेब पाटील, अनिल दादा देशमुख,साहेबराव पाटील,विलास कड, सदुआप्पा शेळके,अशोक वाघ, चिंधु पाटील, किसनराव भुसाळ,राजाभाऊ ढगे, राजेंद्र उफाडे,मच्छिंद्र पवार, डि.एस.उफाडे,बबन जाधव,विश्राम दुगजे,मधुकर देशमुख,भास्करराव संधान,भुकाजी देशमुख,काशिनाथ उगले,रघुनाथ दिघे, सुभाष मातेरे, जयराम जाधव,वंसत मोगल,रघुभाऊ भुसाळ, डॉ.योगेश गोसावी, संतोष रेहरे,विठ्ठलराव अपसुंदे,राहुल कावळे, प्रकाश पिंगळ,नरेशशेठ देशमुख, बापुराव उफाडे,युनियन अध्यक्ष भगवान जाधव, आदींसह सर्व संचालक मंडळ,सभासद, कामगार उपस्थित होते. स्वागत संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले तर संचालक सुखदेव जाधव यांनी आभार मानले.सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.
न्यूज १५ मराठी