सामाजिक : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या १९९१ ते २०२३ पर्यंतच्या माजी राष्ट्रीय छात्र सेना (NCC) च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खेड : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या माजी राष्ट्रीय छात्र सेना कॅडेटच्या विद्यार्थ्यांचा व सहयोगी प्राध्यापक मेजर ए.बी.कानवडे यांच्या सेवापुर्तीच्या निमित्ताने या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी १९९१ ते २०२३ पर्यतच्या सर्व राष्ट्रीय छात्र सेना कॅडेटच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.यातील तर काही विद्यार्थे हे देश सेवेसाठी सैन्य दलातही भरती झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनीहि त्यांच्या सरांच्या बद्द्द्ल स्नेह दाखवून या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती.तर जे विद्यार्थी या स्नेह मेळाव्याला येऊ शकले नाही त्यांनी विज्ञानाच्या युगात ओंनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

ज्या शिक्षकांचा सेवापूर्ती कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या शिक्षकांचे मूळ गाव हे संगमनेर(अहिल्यानगर) तालुक्यातील असून त्यांनी आपली सेवा १९८९ साली हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात सुरु केली होती. त्यात त्यांनी एकूण ३६ वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे व एकूण ३२ वर्षे राष्ट्रीय छात्र सेना कॅडेटच्या(ANO) पदावर मेजर म्हणून अतिशय प्रामाणिक आणि अतुल्य अशी कामगिरी बजावली. या त्यांच्या सेवेला कृतघ्न होऊन त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.या स्नेह मेळाव्याला एकूण १५० च्या वरती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.यावेळी काही माजी विद्यार्थी आपल्या कौशल्याने आणि आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पोलीस अधिकारी,पोलीस,सैन्य, बँक ऑफिसर, सरकारी विविध विभागात अधिकारी,शिक्षक आदी.पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन राष्ट्रीय छात्र सेनाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्पुर्तीने खेड तालुक्यातील कृष्णपिंगाक्ष पॅलेस येथे केले होते.