शाळेसमोर तलवारींसह संशयित फिरत होता; चाकण पोलिसांची धडाकेबाज कारवाई...

शाळेसमोर तलवारींसह संशयित फिरत होता; चाकण पोलिसांची धडाकेबाज कारवाई...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण 

चाकण परिसरात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेसमोरच एक इसम घातक शस्त्रांसह संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट धडक कारवाई केली.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरील मोकळ्या जागेत हा इसम संशयास्पदरीत्या थांबलेला होता. विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असलेल्या ठिकाणीच तो शस्त्रांसह फिरत असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पंचांसमक्ष केलेल्या झडतीत आरोपीकडून २ लोखंडी तलवारी २ लोखंडी चाकू

असा एकूण ₹२,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपीचे नाव शरद परशुराम पोतेले (वय 44, रा. मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे असून त्याच्यावर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत क्षणार्धात आरोपीला पकडले. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

शाळेसमोरच घातक शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या इसमामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेत कारवाई केल्याने मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

 चाकणमध्ये गुन्हेगारीला लगाम बसणार का?