पुण्यात धक्कादायक प्रकार उघड.! "फुलचंद"च्या नावाखाली नशेचा खेळ! पुणेकरांनो सावधान...

पुण्यात धक्कादायक प्रकार उघड.! "फुलचंद"च्या नावाखाली नशेचा खेळ! पुणेकरांनो सावधान...

पुण्यात पानाच्या दुकानातून थेट अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “कडक फुलचंद”च्या नावाखाली ग्राहकांना नशेच्या विळख्यात ओढलं जात असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर परिसरातील “सिद्धेश्वर पानवाला” येथे टाकलेल्या धाडीत हा प्रकार समोर आला. येथे पानामध्ये अमली पदार्थ मिसळून ग्राहकांना झिंग आणणारे पान विकले जात असल्याचे स्पष्ट झाले.

 मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

या धाडीत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:

 सुमारे ७.५ लाख रुपयांचा माल

 ८ किलो ७६० ग्रॅम अमली पदार्थ मिश्रित पावडर

 ३ मोबाईल फोन

या प्रकरणी

बसवराज मानतप्पा काडा,

लक्ष्मीकांत मानतप्पा काडा,

चंद्रकांत श्रीशैल बिरादार

यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

फुलचंद किंवा इतर कडक पान खाताना सावध राहा. अशा प्रकारे नकळत नशा दिली जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

 पुण्यातील हा प्रकार चिंताजनक असून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

 अशा बेकायदेशीर प्रकारांविरोधात कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.