चाकण उत्तर पोलिसांची कारवाई! CEIR पोर्टलच्या मदतीने ३.५० लाखांचे १५ मोबाईल हस्तगत; मूळ मालकांना परत
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण
चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून परराज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले.
गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर करण्यात आला. या तांत्रिक यंत्रणेच्या मदतीने मोबाईलचा माग काढून विविध ठिकाणांहून ते हस्तगत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सचिन मोरखंडे आणि पोलीस अंमलदार महेश कोळी यांनी केली.
गहाळ मोबाईलचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत मिळवून देण्याच्या या कारवाईमुळे चाकण उत्तर पोलिसांच्या कामगिरीची नोंद झाली आहे.
vishwanathkeswad