शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत तुकाराम मुंढे यांची भेट; निकृष्ट अन्नधान्यावर कठोर कारवाईची सभापती विजय शिंदे यांची मागणी

शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत तुकाराम मुंढे यांची भेट; निकृष्ट अन्नधान्यावर कठोर कारवाईची सभापती विजय शिंदे यांची मागणी

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड खेड,

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा, अन्नधान्याची गुणवत्ता तसेच पुरवठा व्यवस्थेबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले.

लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार हा दर्जेदार, पौष्टिक आणि पूर्णपणे सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी समोर येत असल्याने या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सभापती विजय शिंदे यांनी केली.

निकृष्ट अन्नधान्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित पुरवठादार व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ नये. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, पौष्टिक आणि दर्जेदार आहार मिळेल, याची प्रशासनाने खात्री करावी, अशी मागणी विजय शिंदे यांनी केली.