खराबवाडी गावातील सारा सिटी वसाहतीत राहणाऱ्या महिलेला वेश्या व्यवसाय करताना सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक....!

खराबवाडी गावातील सारा सिटी वसाहतीत राहणाऱ्या महिलेला वेश्या व्यवसाय करताना सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक....!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : आळंदी फाट्यावरील गेट नंबर-६११ मधील एमआयडीसी रस्त्यावरील रॉयल इन हॉटेलच्या रूम नंबर-१०५ मध्ये बाहेरील महिलेला आणून तिच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या प्रकरणात खराबवाडी गावातील सारा सिटी वसाहतीतील अहिल्या उर्फ अश्विनी पोपट बढे (वय-२७ वर्षे) रा. फ्लॅट नंबर २०१, दुसरा मजला डी-११ दीक्षित यांच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेस पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार सुनिल जगन्नाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एमआयडीसी रस्त्यावरील रॉयल इन हॉटेलमध्ये अहिल्या उर्फ अश्विनी पोपट बढे नामक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर पीडित महिलांच्याकडुन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खबर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळताच त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून बढे नामक महिलेस रांगेहाथ पकडले. अहिल्या उर्फ अश्विनी बढे हि महिलांची मजबुरी शोधून त्यांना काही आर्थिक प्रलोभने देऊन त्यांना वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात ओढण्याचा धंदा हि महिला करत असल्याचे समोर आले आहे.

या अगोदरही याच महिलेकडून अनेक तरुणांना फसवण्याची प्रकरणे बाहेर आले होते. या महिलेचे मागील बऱ्याच वर्षांपासून सारा सिटी वसाहतीत वास्तव्य आहे. पण त्या महिलेला फ्लॅट धारकासह, सारा वसाहत बिल्डरही बाहेर काढण्याचे नाव घेत नसल्याने कुठे तरी त्यांच्याही कार्य पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणात अहिल्या उर्फ अश्विनी पोपट बढे या महिलेवर महाळुंगे पोलीस चौकीत भा. द. वि ३७०/२ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) किशोर पाटील हे करत आहेत.