योजनेच्या नावाखाली बोगस व्यक्तीकडून महिलांची फसवणूक.!

योजनेच्या नावाखाली बोगस व्यक्तीकडून महिलांची फसवणूक.!

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

सध्या ग्रामीण भागामध्ये एका एनजीओमार्फत योजनेच्या नावावर सर्वे केले गेले जात आहेत. सर्वे करण्यासाठी संबंधित एनजीओने नियुक्त करण्यात आलेले व्हॅलेंटियर किंवा रिपोर्टर असणे अगोदर गरजेचे व बंधनकारक आहे. मात्र सध्या जिल्ह्यात व तालुक्यात एका योजनेच्या नावाखाली एका संबंधित व्यक्तीकडून महिलांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्षेत्रांमध्ये वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

संबंधित व्यक्ती योजनेच्या नावाखाली महिलांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेऊन काहीतरी खोटे-नाटे आश्वासन देऊन काही महिन्याच्या नंतर ५० हजार रुपये भेटण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र संबंधित व्यक्ती जे महिलांकडून काहीतरी कारण सांगून  पैसे घेत आहेत, त्यांच्याकडे संबंधित एनजीओशी जोडले गेले असल्याचे असे कोणतेही नियुक्ती पत्र किंवा अधिकृत पुरावे नाहीत. तरीसुद्धा अशा बोगस व्यक्तींकडून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे. सर्वे करणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित एनजीओसी जुळले गेले असल्याचे असे कोणत्याही पद्धतीचे पुरावे नसूनसुद्धा असले हे व्यक्ती गावागावात जाऊन सर्वे करण्याच्या नावावर व योजनेच्या नावावर महिलांची व जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करत आहेत. मात्र या संदर्भात संबंधित एनजीओ च्या लोकांशी चर्चा केल्यानंतर कोणतेही पद्धतीची फी घेतली गेली जाणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तरी मात्र आता एनजीओच्या मार्फत योजनेच्या नावावर फी घेण्यात येते ते नेमकी कशासाठी?फी घेणारे लोकं हे बोगस तर नाही ना? किंवा त्यांचा संबंध सदर एनजीओशी आहे का ? किंवा त्यांच्याकडे संबंधित एनजीओसी जुडले गेले असल्याचा पुरावा आहे का? असे अनेक प्रश्न आता ग्रामीण भागातील जनतेकडून उमटू लागले आहेत. त्यामुळे होणाऱ्या या गैरप्रकाराकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने व संबंधित पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.