परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद...
![परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद...](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_675acb5d51d2e.jpg)
प्रतिनिधी - शांतीलाल शर्मा, परभणी
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या प्रतीकृतीचा अवमान करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे; या मागणीसाठी व या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायींनी बुधवारी दि. ११ पालम शहर बंद चे आवाहन केले होते.
शहरातील व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला व पालम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.
दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरासह तालुक्यातील आंबेडकर अनुयायींनी एकत्र जमून, पालम बौध्द विहारापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून; संविधान बचाव संदर्भात घोषणा दिल्या.
तसेच आरोपीस कठोर शासन करावे या मागणीसाठी आक्रोश करत नायब तहसीलदार राजेश्वर पवळे यांना निवेदन दिले.
शहरासह तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी आंबेडकर अनुयायी, बहुजन समाज बांधव व महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. या दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.