पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गुटखा विक्री; पोलिस प्रशासनावर विधानपरिषदेत कडक ताशेरे...

पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गुटखा विक्री; पोलिस प्रशासनावर विधानपरिषदेत कडक ताशेरे...

प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, पिंपरी चिंचवड

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पुणे आणि Pimpri-Chinchwad शहरात दिवसाढवळ्या खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित झाला. विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा विषय मांडत पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनावर कडक ताशेरे ओढले.

गोरखे यांनी सांगितले की शहरातील अनेक पानटपऱ्यांवर गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. या प्रकाराकडे पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे व्हिडिओ पुराव्यांतून समोर आले आहे.

तसेच कर्नाटक आणि सीमावर्ती भागातून मोठ्या ट्रकमधून गुटखा शहरात आणला जातो आणि नंतर लहान वाहनांद्वारे विविध भागात त्याचे वितरण केले जाते. या साखळीत काही मोठे गुटखा जाळे कार्यरत असल्याचा आरोपही करण्यात आला.

शहरात खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही गोरखे यांनी विधानपरिषदेत केली.