नदीवाडी ग्रामस्थांचे विविध मागण्यासाठी निलंग्यात अमरण उपोषण.! उपोषणाचा दुसरा दिवस...

नदीवाडी ग्रामस्थांचे विविध मागण्यासाठी निलंग्यात अमरण उपोषण.! उपोषणाचा दुसरा दिवस...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी निलंगा (लातूर)

निलंगा तालुक्यातील नदीवाडी गावातील गावठाण मोजून कायम करावे, या मागणीसाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करुनही दखल घेतली नसल्याने येथील ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून दुसऱ्या दिवशी ही प्रशासनाचे दुर्लक्षच  आहे.

निलंगा तालुक्यातील नदीवाडी येथील गावठाण क्षेत्राची मोजणी करून हद्द कायम नसल्याने या ठिकाणी वारंवार वादविवाद होऊन कायम पोलीस कारवाई होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार विनंती करुनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने येथील ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बैनगीरे, सुरज पाटील आदी ग्रामस्थांनी ययेथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आज दि .13 ऑगस्ट हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, विजयकुमार पाटील, अजित माने, आंबादास जाधव,

सुधाकर पाटील आदींनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांची भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन गावठाण कायम करावे अशी मागणी केली.