बेरोजगार युवकांनी काढला शासनाविरोधात मोर्चा.! बेरोजगारांना माशिक भत्ता देण्याची मागणी...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया
महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या भरतीमध्ये परीक्षा शुल्क कमी करावे, सरळ सेवा भरती फी शंभर रुपये करावी, तालुक्यातील एमआयडीसी सुरू करावी, बेरोजगार युवकांना संधी द्यावी यासह अनेक मागण्या घेऊन जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी शासनाविरोधात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
शासनाचे अनेक निर्णय हे सर्वसामान्य, गरीब, मजूर व होतकरू तरुण यांच्या विश्वासाला नष्ट करणारे आहेत. शासनाच्या अन्यायकारी निर्णयामुळे समाजात अविश्वास, द्वेष अराजकता पसरत आहे. आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून मांगणी मांडली की सर्व महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणार असल्याला परीक्षांच्या शुल्क फक्त १०० रुपये घ्यावा. जिल्हा परिषद सरवसेवा भरतीमध्ये सर्व उमेदवारांकडून १०० रु. फी आकारण्यात यावी, बेरोजगार युवकांना बेरोजगारी मासिक भत्ता देण्यात यावा, सडक अर्जुनी येथे MIDC तयार करावी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव येथील MIDC मध्ये उद्योग आणावे जेणेकरून युवकांच्या हाताला काम मिळेल. या सर्व या मांगनी ला घेऊन आज जिल्हाधिकारी चिंमय गोतमारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.