जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश मिळवावे - डॉक्टर अपर्णा टोम्पे (MD (Radiology USA)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथील मल्हाराव होळकर परिवाराच्या वतीने अमेरिकेतील नामांकित हारवर्ड ब्रिगहॅम आणि वूमन्स हॉस्पीटल येथील वैद्यकीय विद्यापीठात रेडिओलॉजीमध्ये आशा कठीण वैद्यकीय अभ्यासक्रम क्षेत्रात फेलॉशिप डॉक्टर अपर्णा टोम्पे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलतांना डॉ.अपर्णा टोम्पे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवावे असे संबोधित केले आहे.
पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करून शिक्षकासमोर प्रश्न निर्माण केले पाहिजे कारण युट्युब, गुगल मुळे शिक्षण बोटावर मिळते त्याचा पुरेपूर उपयोग करावा, पालक व विद्यार्थी यांच्यात सुसंवाद असावा आणि मेहनत, जिद्द, चिकाटी ठेवून मोठे स्वप्न पहा ते स्वप्न सत्यात उतरतील.
शिक्षकांबद्दल बोलतांना म्हणाल्या की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण शिक्षण द्यावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बालरोग तज्ज्ञ संस्थापक डॉ.पांडूरंग टोम्पे, माजि प्राचार्य शोभा टोम्पे, डॉ. अश्विनी टोम्पे, डॉ.अपर्णा टोम्पे, मुख्याध्यापक रामकिशन कराड, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.