मनेगावच्या हर्षलाची सहाय्यक सहकार अधिकारी पदाला गवसणी...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
सिन्नर तालुक्यातील मनेगावच्या हर्षला शिरसाट यांनी (एम एस सी ॲग्री) एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक सहकार अधिकारी पदाला गवसणी घालत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
मनेगाव येथील सुतार विश्वकर्मा संघटनेचे कै.बाळकृष्ण म्हसुजी शिरसाट यांची हर्षला ही कन्या असून, लहानपणापासूनच शिक्षणाचे आवड असल्याने तसेच वडिल शिरसाट यांचेही आपल्या मुलीला क्लासवन अधिकारी बनवण्याचे स्वप्न निश्चित केले होते. सर्वसामान्य परिस्थिती असतानाही आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हर्षला येणे सिन्नर येथील वाजे विद्यालयात आपले बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून, पुढील शिक्षणासाठी पुणे येथील मुक्त विद्यापीठात आपले शिक्षण घेतले. आपल्या वडिलांची अधिकारी बनण्याची इच्छापूर्ती करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास एके अभ्यास हाच विषय डोक्यात ठेवून यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार सोमवार दि.11 रोजी महाराष्ट्र राज्य सहकार व पणन विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात हर्षला बाळकृष्ण शिरसाट यांनी घवघवीत यश संपादन करत; थेट सहकार अधिकारी श्रेणी २ या (नाशिक विभाग) पदाला गवसणी घातली. मात्र आज वडील बाळकृष्ण शिरसाठ हर्षलाचे यश पाहण्यासाठी नसले तरी जिद्द व चिकाटी परिस्थितीवर मात करून, हे यश संपादन केले आहे. त्यामुळे हर्षलाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या या यशाबद्दल अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघटनेच्यवतीने प्रदेशअध्यक्ष सुदाम खैरनार, बाळासाहेब शिंदे, रमेश जाधव, बापू चव्हाण, दत्तात्रय खैरनार, रमेश शिरसागर, संजय मोरे, त्र्यंबक जगताप, अनिल सूर्यवंशी अदिन सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.