महात्मा फुले महाविद्यालयात.! ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन...

महात्मा फुले महाविद्यालयात.! ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांना विनम्र अभिवादन...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी अति उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव बोडके यांच्या शुभहस्ते रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल प्रा. डॉ. सदाशिव वरवटे यांनी करताना, सात दिवशीय सप्ताहनिमित्त वाचनासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथ खुले ठेवण्यात आले होते. याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला असल्याचे सांगून, डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या विषयीची माहिती सांगण्यात आली. यानंतर प्राचार्य डॉ. बोडके यांनी रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना ग्रंथालय चळवळीचे जनक, गणित तज्ञ रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचे पाच मूलतत्त्वे मांडले.! जी आज ही ग्रंथालय व्यवस्थापनाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी पुस्तकाचे वर्गीकरण करण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आणि डिजिटल माहितीचे वर्गीकरण केले. यामुळे आवडीचे पुस्तक सहज उपलब्ध झाले. वाचकांचा वेळ वाचला. त्यानी ग्रंथालय शास्त्राला दिलेली देणगी अमूल्य आहे. आजही त्यांचे विचार ग्रंथालय क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरतात असे ही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विठ्ठल चव्हाण,  प्रा. बालाजी आचार्य, प्रा. संजय जगताप, डॉ. भारत भदाडे,  डॉ. प्रभाकर स्वामी, डॉ. अनंत सोमुसे, डॉ. चेतन मुंढे, डॉ. दर्शना कानवटे, प्रा. पद्मजा हगदळे, ग्रंथालय परिचर इंद्रदेव पवार, डॉ. संतोष पवार, कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे, उद्धवराव जाधव, शिवाजी हुबाड, अनिल भदाडे, शेख आखिल, किशन धरणे आदी विद्यार्थी उपस्थित होते.