उन्नती एज्युकेशन सोसायटी, नाशिक संचलित सौ.विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा...

NEWS15 प्रतिनिधी - नाशिक
दिंडोरी : तळेगांव (दिंडोरी) येथील सौ.विमलताई वासुदेव शिनकर माध्यमिक विद्यालयात आज महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. डॉ, शितल कुंभारे मॅडम व विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पितृभक्त यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर प्रास्ताविक करतांना पितृभक्त सर यांनी महिला दिन का साजरा करतात व देशाच्या विकासात विविध महिलांची योगदानाची उदाहरणे दिलीत. यावेळी विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त महिलांचे विविध प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय असे कर्तुत्व या विषयावर अप्रतिम असे वकृत्व केले.
महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष सुपुष्प रूग्णालयाच्या संचालिका डॉ. शितल कुंभारे मॅडम यांचा शाल, गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका, विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा देखील गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. टोपले सर यांनी देखील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी शिक्षित व निर्भिड होणे काळाची गरज आहे; असे आवाहन केले. तसेच सौ. मुसळे मॅडम यांनी देखील शिक्षक मनोगतात सत्कारास उत्तर देतांना महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने तिचे अस्तित्व निर्माण केले. व प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. याचे अनेक दाखले दिले. अध्यक्षीय भाषणात डॉ शितल कुंभारे मॅडम यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी अभ्यास कसा करावा आणि मुलींनी सर्व उपक्रमात सहभाग घेऊन प्रगतीपथावर रहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यानी केले तर आभार किशोर क्षिरसागर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.