शालेय मंत्रीमंडळ स्थापन करून, विद्यार्थ्यांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती...
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी येथून सात किमीटर अंतरावर असलेल्या झरी जामणी तालुक्यातील राजाराम विद्यालय अहेरअल्ली येथे शाळेचा अभिनव उपक्रम आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जवळ आलेले आहे.
निवडणूक म्हणजे काय मोठी माणसे मतदान कसे करतात ईव्हीएम मशीन कशी असते, मतमोजणी कशी करतात शाई का लावतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात.
त्यावेळी शाळेतील श्री श्रीनाथ लक्षट्टीवार सर यांनी शालेय विद्यार्थ्यांना दोन गटात विभागत निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला, आणि ही प्रक्रिया सर्व शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या सहकार्याने शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी केली.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक विजय राजुलवार ,श्रीनिवास नुगुरवार सर, सुदर्शन कांबळे श्रीनाथ लक्षट्टीवार ,प्रणित लक्षट्टीवार ,उदय लक्षट्टीवार पायल बावणे मॅडम, लिपिक विजय राऊत बाबू , किशोर डहाके बाबू ,वेंकटेश चंदावार बाबू ,भीमना कोतपेल्लीवार यांनी उपस्थित होते.