शिक्षकांची भरती करण्याची मागणी...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक (दिंडोरी) : दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांची तत्काळ शिक्षक भरती करण्यात यावी; याबाबत गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी जवळपास सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतात. एकीकडे आदिवासींच्या विद्यार्थ्यांचे विकास व्हावा व जनतेचे प्रश्न मार्गी लागावा, यासाठी सर्वत्र आयोगाची स्थापना करण्यात आली व एकीकडे आदिवासी भागामध्ये शिक्षकांचा तुटवडा जाणवत आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी याबाबत लवकरात लवकर यावर तोडगाकाढून, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची भरती तत्काळ करावी; अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईलअसा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा कार्याध्यक्ष संतोष रहेरे, आनंदराव गवळी, दिनकर बागूल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.