विनोबा ॲपद्वारे तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शिक्षकांचा सन्मान...

विनोबा ॲपद्वारे तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या शिक्षकांचा सन्मान...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

नाशिक जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशनच्या विनोबा ॲप शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अंतर्गत विनोबा ॲप मधील पोस्ट ऑफ द मंथ अव्वल ठरलेल्या दिंडोरीच्या जिल्हा परिषद चाचडगाव, उमराळे बु.शाळेच्या रंजना बछाव व सुनीता भामरे यांना गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता अहिरे,कैलास पगार,नाशिक जिल्हा समन्वयक राकेश महाजन,शिक्षण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

विनोबा ॲपवर शिक्षक आपले नावीन्यपूर्ण उपक्रम टाकत असतात.हे ॲप जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांसाठी शेअरिंग व लर्निग प्लॅटफॉर्म आहे.