लोहिया विद्यालयाची उत्कृष्ठ यशाची परंपरा कायम.! तालुक्यातून प्रथम...

लोहिया विद्यालयाची उत्कृष्ठ यशाची परंपरा कायम.! तालुक्यातून प्रथम...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

लोहिया शिक्षण संस्था, सौंदड द्वारा संचालीत रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) विद्यालय, सौंदड येथील फेब्रुवारी-मार्च-2024, च्या विभागीय शिक्षण मंडळ, नागपुर द्वारा पार पडलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दि. 27 मे 2024 ला घोषित करण्यात आला.

अल्मास  शेख  तालुक्यातून प्रथम. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातून एकूण 119 विद्यार्थी प्रविष्ठ झाले व  सर्वच 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  100% निकाल लागला आहे. यापैकी प्राविण्य श्रेणीत - 83 प्रथम श्रेणीत-27 द्वितीय श्रेणीत-09 अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

दरवर्षीप्रमाणे एस.एस.सी. परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.  15 विद्यार्थ्यानी 90% व त्यापेक्षा जास्त गुण घेवून विशेष प्रावीण्य प्राप्त केले. त्यापैकी  कु.अल्मास आशिफ इकबाल शेख - 96.00%, रिद्धी चोपराम मेंढे - 94.80%, कु. गायत्री रवींद्र खरवडे - 94.80%, कु.शर्वरी किशोर ठाकरे - 94.40%, कु.नाज भाग्यवानकुमार शहारे- 93.60%, कु.वैभवी संतोष गहाने - 93.60%, कु. मानशी घनश्याम गहाने 92.20%, शंतनु सुनील ठवकर  92.20%, कु.जुही किशोर बडोले 91.60%, यश दुर्योधन दिघोरे - 91.20%, कु.आयुश्री बिरला गणवीर 91.20%, तुषार जयेंद्र वंजारी 91.00%, कु. साहीली विजय गोबाडे 90.20%, कु. प्रिया विनोद देवगडे 90.00%, कु. द्रोनाली महेश राघोर्ते -90%, यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळविले आहे. विशेष म्हणजे 10 वी व 12 वीच्या मंडळाच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची परंपरा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.

शाळेतील प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश लोहिया, संस्था सचिव पंकज लोहिया, प्राचार्य उमा बाच्छल, संस्था व विद्यालयाच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संस्थापक जगदीश लोहिया यांनी; विद्यार्थ्यानो आपल्या स्वप्नाचा पाठलाग करून जीवनात आपले ध्येय साध्य करा.! असे मार्गदर्शन करून, त्यांचे अभिनंदन केले व भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई - वडील, संस्थापक जगदीश लोहिया, सचिव पंकज लोहिया, प्राचार्या उमा बाच्छल तसेच सर्व शिक्षकांना दिले.